पं. विवेक सोनार यांच्या बासरीच्या सुराने एरांडोलकर झाले मंत्रमुग्ध

0

एरंडोल । ए रंडोल येथे श्री संत वूपरपशीुरी द्यानेश्वर संगीत अकादमीतर्फे रा.ती.काबरे विध्यालायाच्या पटागनावर दि. 25 फेब्रु.रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या बासरी वादनाच्या ‘अर्पण’ कार्यक्रमास उपस्थित असलेले हजारो रसीक मंत्रमुग्ध झाले. बासरी वादक योगेश पाटील यांनी फ्लूट सिम्फनी अंतर्गत ‘अर्पण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बासरीवादक प.विवेक सोनार व तबलावादक प.किशोर पांडे यांच्या जुगलबंदीस उपस्थित रासीकांच्या उत्सस्पुर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमात एकाचवेळी 25 बासरी वादकांनी रचना सादर करून श्रोत्यांची मने जिकली.

कार्यक्रमातून शहरात संगीत क्षेत्राचे बिज रोवले
बासरी वादक योगेश पाटील यांनी अर्पण कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरात संगीत क्षेत्राचे बिज रोवले असून आगामी काळात देखील असेच उपक्रम राबवून राशिकांना संगीत क्षेत्राची मेजवानी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पं.विवेक सोनार यांनी राग बागेश्री या श्रुगार प्रधान रागामध्ये रूपक व तिन तालामध्ये अवीट रचना सादर केल्या पहाडी धूनने त्यांनी सांगता केली त्यांना तबलावादक प.किशोर पांडे यांनी साथ दिली. बासरी व तबल्याच्या जुगलबंदीने रसिकांना संगीताची मेजवानी मिळाली संत द्यानेश्वार अकादमीचे संचालक बासरीवादक योगेश पाटील यांच्या शिष्यांनी आरंभी वंदिन, सैराट, दिल है छोटासा, पंख होते तो, इश्क सुफियाना, या गाण्यांसह राग, भूपाळी, दुर्गा, यमन, भजने, राग रचना सादर केली. योगेश पाटील यांनी सादर केलेल्या राग भीमपलास व फ्लूट सिंफनी मध्ये एकाचवेळी 25 बासरी
वादकांनी रचना सादर करून गुरु प. विवेक सोनार यांना मानवंदना दिली.त्यांना सचिन जगताप, सागर सपकाळे, देवेंद्र गुरव यांनी साथ दिली. रवींद्र कुलकर्णी व जयश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.बी.ए.कुलकर्णी यांनी आभार मानले

कार्यक्रमास यांची उपस्थिती
कार्यक्रमास आमदार डॉ.सतीश पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, नरेंद्र पाटील, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज बिर्ला, यशवंतराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, योगेश महाजन, कृणाल महाजन, उद्योजक विजय जाधव, सुनील जाधव, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांचेसह हजारो रसीक उपस्थित होते.