पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त आरोग्य शिबिराची सागंता

0

पाचोरा । येथील शहर व ग्रामीण भाजपा वैद्यकीय आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर राबविण्यात आले. बुधवारी 3 रोजी शिबीराची सांगता झाली. पं.दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने राबविण्यात आलेल्या शिबीरात कान-नाक-घसा आदी विकारांचे निदान करण्यात आले. शिबिराचे आयोजन डॉ.सजीव पाटील यांच्या रुग्णालयात करण्यात आले. शिबिरात 263 रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबीराचे आयोजन करण्यात आल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. रूग्णांची तपासणी डॉ. सजींव पाटील यांनी केली.

यावेळी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील, जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, शहर अध्यक्ष नंदु सोमवंशी, माजी नगरसेवक दत्ता पाटील, सतिश शिंदे, रविंद्र पाटील, रमेश वाणी, डी.एम.पाटील, पंचायत समिती सदस्य बन्सिलाल पाटील, वैद्यकीय आघाडी जिल्हाअध्यक्ष डॉ.संजीव पाटील, डॉ.जीवन पाटील, डॉ.एम बी.परदेशी, स्रिरोग तज्ञ डॉ.किशोर पाटील, प्रदिप पाटील, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, निरज जैन, महीला आघाडीच्या रेखा पाटील आदी उपस्थितीत होते. शिबिर यशस्वी साठी चुडामन पाटील, संजय पाटील, जहांगिर शेख, श्रध्दा कुळकर्णी, शुभम पाटील, अविन गोसावी आंदी नी परीश्रम घेतले. शिबीराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे होते.