पंधरा बंगला भागातील अतिक्रमितांचे तिसर्‍या दिवशीही उपोषण कायम

0

भुसवळ- शहरातील रेल्वे हद्दीतील पंधरा बंगला भागातील अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने हटवल्यानंतर त्यांना पर्यायी जागा देण्यासाठी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडले असून तिसर्‍या दिवशीही उपोषण कायम होते. उपोषणार्थींना शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेली सर्वे क्रमांक 63/1 ही जागा मान्य नसल्याने सर्वे क्रमांक 181, 182, 183, 191, 192 या परीसरातील ओपन स्पेस तसेच सरकारी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष मोहन निकम यांच्या नेतृत्वात उपोषण छेडण्यात आले आहे. या उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा दर्शवला असून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या उपोषणात विनोद निकम, आनंद नरवाडे, दीपक सोनवणे, शेख रशीद शेख बशीर, सम्राट सुरेश बनसोडे, शेख मोहसीन शेख मजीद, संदीप करमजीत, सुनील सोनवणे यांच्यासह शेख सलीम अल्ला रजीया बी., शाईन बी., खुर्शीद बी., मुक्त्यार बी., गोपी म्यांद्रे यांच्यासह अन्य महिला व पुरूष उपोषणात सहभागी झाले आहेत.

Copy