पंतला आधार देण्याची प्रशिक्षकांची विनंती

0

दिल्ली । दिल्ली डेयरडेविल्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक पैडी अप्टन ने आपल्या संघातील खेळाडूंना युवा खेळाडू ऋषभ पंत याला मानसिक आधार देण्याची विनंती केली आहे. ऋषभ यांच्या वडिलांचे बुधवारी रात्री निधन झाले आहे.प्रमुख प्रशिक्षक पैडी अप्टन यांचा अंदाज आहे की वडिलांच्या अवेळी निधनामुळे 20 वर्षीय यष्टीरक्षक व फलंदाज याच्या कामगिरीवर प्रभाव पडू शकले,मला विश्‍वास आहे की संघातील खेळाडू त्याला या दुखातून उभारण्यासाठी मदत करतील.यावेळी बोलतांना अप्टन म्हणाले की,ऋषभ युवा खेळाडू आहे.

एक संघाच्या स्वरूपात त्याला अधिक मानसिक आधार देण्यासाठी समर्थन करित आहे. ते ही काही दिवसांसाठी नाही तर पुर्ण आयपीएल पर्यंत.त्याला वडिलांचे निधन झाल्याचे दु:ख आहे.मात्र त्याच्या खाजगी व घराची परिस्थिती माहित असल्याने त्याला आपण पुर्ण समर्थन करणार आहे. दिल्ली डेयरडेविल्सच्या संघाला जेपी डुमिनी हा आपल्या खाजगी कारणामुळे आयपीएलच्या 10 सिझनमध्ये खेळू शकत नसल्याने तो संघाबरोबर नाही आहे. हा मोठा धक्का होता. त्यात टी-20 मध्ये अंतराष्ट्रीय मे भारताचे प्रतिनिधीत्व करणारा युवा खेळाडू पंत ने रणजी चषकमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. पंत ने रणजीच्या ईतिहासात सर्वाधिक जलद शतक बनविले आहे. तो डावा हाताचा फलंदाज असून त्याने 48 धावामध्ये शतक पुर्ण केले आहे.