पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार वर्षपूर्ती अभियान : अजय भोळे कुटुंब संपर्कप्रमुखपदी

1

भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अभियान राबवण्यात येत असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात त्यासाठी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. भुसावळचे माजी नगरसेवक तसेच ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांची रावेर लोकसभा मतदारसंघात कुटुंब संपर्काची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदी सरकारने राबविलेल्या निर्णयांची तसेच पंतप्रधानांनी लिहिलेले पत्र रावेर लोकसभा मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचणार असल्याचे अजय भोळे यांनी सांगितले. दरम्यान, अन्य पदाधिकार्‍यांची यात निवड करण्यात आली आहे.

Copy