पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना दुसरा हप्ता मिळावा

0

भुसावळ : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना दुसरा हप्ता मिळावा, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत भुसावळ शहरातील 48 लाभार्थींना मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी आपली जुनी घरे पाडून नवीन घर बांधकामाला सुरुवात केली होती तर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व लाभार्थींनी स्लॅप लेव्हलपर्यंत बांधकाम केले मात्र नगरपालिकेने लाभार्थींना 18 मार्च 2020 रोजी केवळ 40 हजारांचा पहिला हप्ता दिला व तब्बल चार महिन्यांपासून या योजनेतील लाभार्थींना दुसर्‍या हप्त्याचे बिल दिलेले नाही.

कायमस्वरुपी मुख्याधिकार्‍यांची अडचण
भुसावळ नगरपालिका यांच्याकडे वारंवार विचारणा केल्यावर येथे कायम मुख्याधिकारी नाही, असे कारण पुढे केले जाते तसेच भुसावळ नगरपालिकेत वारंवार फेर्‍या मारून सुध्दा काही एक उपयोग झालेला नाही. गेल्या सात महिन्यांपासून हे लाभार्थी भाड्याच्या घरात राहत असल्याने गरीब लाभार्थींचा विचार करून लाभार्थीच्या बँक खात्यात पंतप्रधान आवास योजनेचे दुसरा जप्ता जमा करावा, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी केली आहे.

Copy