पंतप्रधानांसह सर्व मुख्यमंत्री, आमदार, खासदारांची होणार लसीकरण

0

नवी दिल्ली: भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच फ्रंट लाईन करोना योद्ध्यांचे लस देण्यात येत आहे. लवकरच दुसरा टप्प्या सुरु होणार असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, सर्व आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणाऱ्या राजकीय नेत्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक राजकीय नेते ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. त्यांना विविध व्याधी असल्याने त्यांनाही लस देण्यात येणार आहे.

भारतात सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन, कोवीशिल्ड या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने करोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिलमध्ये सुरु होणार आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देणार आहे.

Copy