Private Advt

पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांची प्रतिमा लावली सभागृहात

मुक्ताईनगरात भाजपा-सेनेचा पुढाकार : नगराध्यक्षांच्या दालनात लावल्या पदाधिकार्‍यांनी प्रतिमा

मुक्ताईनगर : नगरपंचायतीत नगराध्यक्षांच्या दालनात भाजपा व शिवसेनेच्या पुढाकाराने अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमा भेट देऊन लावण्यात आल्या.

सभेत पदाधिकार्‍यांनी उचलला आवाज
19 एप्रिल रोजीच्या नगरपंचायतीच्या विशेष सभेत महापुरुषांचे तसेच पंतप्रधान, स्व.बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री यांच्या प्रतिमा लावण्यावरून प्रभारी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याशी नगरसेवकांचा शाब्दिक वाद झाला होता. परीपत्रक तपासणार नंतरच प्रतिमा लावणार, असा शब्द मुख्याधिकारी यांनी दिला होता परंतु देशाचे पंतप्रधान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व राज्याचे मुख्यमंत्री यांची प्रतिमा लावण्याकरिता परीपत्रक शासनदरबारी नमूद आहे परंतु माजी मंत्री खडसे यांचा फोटो लावण्याचा कोणता जीआर आहे ? असा प्रतिप्रश्न विचारल्यानंतर देखील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यातर्फे कोणतेही उत्तर न मिळाल्याने शेवटी तालुक्यातील शिवसेनेने पुढाकार घेत सोबत भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रतिमा नगराध्यक्षांच्या दालनात लावल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, तालुकाप्रमुख प्रफुल पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, पंकज राणे, वसंता भलभले, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, मुकेश वानखेडे, निलेश शिरसाठ, संतोष मराठे, आरीफआजाद, नूर मोहम्मद खान तसेच भाजपाचे नगरसेवक तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख ललित महाजन उपस्थित होते.