पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहने भुसावळमार्गे गुजराथ राज्यात

Cars of Prime Minister Modi’s security convoy ran from Bhusawla to Gujarat state भुसावळ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजराथ राज्यात येत असून त्याच्या सुरक्षेच्या ताफ्यातील सहा गाड्या रेल्वेद्वारे भुसावळात आल्यात. त्या येथून बायरोड गुजराथ राज्यात सोमवारी सकाळी रवाना झाल्या.

भुसावळात थांबली वाहतूक
पंतप्रधान मोदी यांचा गुजराथ दौरा असून त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या ताफ्यातील गाड्या या सुध्दा गुजराथ येथे जात आहे. या गाड्या रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष मालगाडीतून या गाड्या येथील प्लॅटफॉर्मवर उतरविण्यात आल्यात. येथून या गाड्या सायंकाळी 7.35 वाजता वरणगाव आयुध निर्माणी येथे गेल्यात तेथे रात्री मुक्काम करून त्या गाड्या सोमवारी सकाळीच महामार्गाने गुजराथकडे रवाना झाल्या. काळया रंगाच्या असलेल्या या गाड्या भुसावळच्या रस्त्यावरून गेल्याने एका पाठोपाठ सहा गाड्या गेल्याने रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली. रेल्वे स्थानकाच्या केला साईडींगकडून या गाड्या निघून गांधी पुतळा, जळगावरोडने वाय पॉइंट व तेथून महामार्गाने वरणगावकडे रवाना झाल्यात. या गाड्यांसाठी जळगाव येथून विशेष गाडी व पोलिस बंदोबस्त येथे दुपारी चारलाच दाखल झाला. यावेळी स्थाकावरील मोटार सायकल पार्कीगच्या आवारात या गाड्या उतरविण्यात आल्यात. तेथे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, लोहमार्ग पोलिस, शहर पोलिस, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थितहोते.

दुसर्‍यांदा ताफ्यातील कॅन्हॉय भुसावळात
यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग असतांना त्यांची मुलगी व नातेवाईक अजिंठा येथे लेण्या पहाण्यासाठी आले असता, त्यावेळी सुरक्षा ताफ्यातील गाड्या आल्या. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यातील जामरच्या गाडीसह अन्य सहा गाड्या येथे उतरल्या होत्या. स्थानिक पोलिसांच्या सुरक्षेत या गाड्या रवाना झाल्या.