पंतजलीच्या कोरोनावरील औषधीला राज्यात बंदी

0

मुंबई:- पंतजलीच्या कोरोनील औषधावर राज्यसरकारने विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनीलला महाराष्ट्रातही झटका लागला आहे.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असं सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपीठानं हे औषध तयार केलं असून मंगळवारी ते लाँच करण्यात आलं. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारने या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर आली होती.

Copy