पार्थ पवार लढविणार विधानसभा निवडणूक?

0

पंढरपूर: राष्ट्रवादीचे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने विधानसभेची एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. तशी मागणी देखील राष्ट्रवादीचे काही नेते करत आहेत. त्यामुळे आता पार्थ पवार हेच पोटनिवडणूक लढणार का? याकडे लक्ष लागले आहे.

पार्थ पवार यांनी पुण्यातील मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले आहे. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी विरोधी भूमिका देखील अनेक वेळा घेतली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी असेल, हिंदुत्त्वाचा मुद्द्यावरून राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेतली होती. यानंतर ते बरेच चर्चेत आले होते. आता पुन्हा पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीवरून चर्चेत आले आहे.

Copy