पंजाबमध्ये एका वाहनातून चार संशयित ताब्यात !

0

पठाणकोट-पठाणकोट-जालंधर हायवेवर तपासणी दरम्यान पोलिसांनी चार संशयिताना ताब्यात घेतले आहे. हिमाचल प्रदेशची नंबरप्लेट असलेल्या स्कॉर्पियो गाडीमध्ये हे चार संशयित होते. सध्या पंजाब पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. काही दिवसांपूर्वी पठाणकोटच्या मोधोपूर येथून एक चारचाकी वाहन पळवण्यात आली होती.

त्यानंतर दोन आठवडयांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी पंजाबमार्गे भारतात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. पंजाबमधील फिरोजपूर जिल्हा हा भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ येतो. वेश बदलून हे दहशतवादी या मार्गे भारतात दाखल झाल्याची माहिती होती. त्यामुळे पंजाब आणि दिल्लीमध्ये सर्तकतेचा इशारा देण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे या भागातील संशयास्पद हालचालींबाबत पोलीस प्रचंड सर्तक असतात.

Copy