पंकज शिंदे यांना नाशिक विभागस्तरीय गुरुगौरव पुरस्कार

0

चोपडा : येथील प्रताप विद्या मंदिराचे उपशिक्षक पंकज प्रतापराव शिंदे यांना यंदाचा ओबीसी विद्यार्थी, शिक्षक, पालक विकास असोसिएशन धुळे यांच्यातर्फे दिला जाणारा नाशिक विभागस्तरीय गुरुगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम व सेवांसाठी त्यांचा गौरव करण्यात आला.
धुळे येथील धोंडो केशवराव गरुड सभागृहात शिक्षक आमदार सुधीर तांबे, अ‍ॅड. ललिता पाटील, असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यशाबद्दल मान्यवरांचे कौतूक
त्यांच्या या यशाबद्दल चोपडा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व्ही.सी.गुजराथी, उपाध्यक्ष श्रीराम अग्रवाल, सचिव माधुरी मयूर, चंद्रहास गुजराथी सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक अरुणा पाटील, उपमुख्याध्यापक आर.बी. देशमुख, उपप्राचार्य डी.एस. पांडव, पर्यवेक्षक डी.व्ही. यादनिक, ए.टी. पाटील, डी.के. महाजन, गोविंद गुजराथी, उल्हास गुजराथी तसेच चुंचाळे येथील मित्र परिवार आदींनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.