पंकज व साजशी यांचा मंगल परिणय उत्साहात

0

भुसावळ : येथील चि. पंकज अडावतकर व चि.सौ.का. साजशी गोडघाटे यांचे मंगल परिणय सोहळा रविवार 25 रोजी रात्री 8.30 वाजता संत गाडगेबाबा विद्यालयाच्या पटांगणावर उत्साहात पार पडला. शिवाजी नगर परिसरातील नसरवानजी फाईल येथून सायंकाळी नवरदेवाची वरात काढण्यात आली. यानंतर रात्री मंगलमय वातावरणात तथागत भगवान गौतम बुध्द व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वंदना करण्यात येऊन विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी भेटी देवून वधू-वरांना शुभार्शिवाद दिले. तसेच 26 रोजी दुपारी 1 ते 4 वाजता सरस्वती नगर येथे मांडव परतणीचा कार्यक्रम होणार आहे.