पंकज विद्यालयातील शिक्षक आर.डी.पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0

चोपडा । येथील पंकज विद्यालयाचे शिक्षक आर.डी.पाटील यांना मानवसेवा विकास फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महात्मा ज्योतीबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने मुंबई येथील मराठी ग्रंथ संग्रहालयचा सभागृहात गौरविण्यात आले. त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक क्रीडा पत्रकारिता अपंग कल्याण इत्यादी कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार प्रसंगी मान्यवरांची होती उपस्थिती
सदर पुरस्काराचे वितरण मुकुंद वसुले (शेगावीचा राजा चित्रपट अभिनेता), अनिल महाजन (गर्जा महाराष्ट्र टि.व्ही.न्यूज चॅनेल), शत्रुबीन सिन्हा, पदमजा खटाव ( सिने अभिनेत्री), किशोरानंद देशमुख (विभागीय आयुक्त), नंदकिशोर पाटील (अध्यक्ष मानवसेवा विकास), राखी रासकर, वर्षा देशमुख, विजय वैती, विनोद पाटील आदी उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, सचिव अशोक कोल्हे, संचालक भागवत भारंबे, नारायण बोरोले, गोकुळ भोळे, मुख्याध्यापक एम.व्ही. पाटील, व्ही. आर.पाटील, डॉ. संभाजी देसाई, भाईदर पती, रेखा पाटील, नीता पाटील व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.