Private Advt

न्हावी गावातील 70 वर्षीय वयोवृद्धेची आत्महत्या

यावल : तालुक्यातील न्हावी येथील 70 वर्षीय वयोवृध्देने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निर्मलाबाई मुरलीधर पाटील (पाटील वाडा, न्हावी) असे मयत वृद्धेचे नाव आहे.

फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
निर्मलाबाई या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून सोमवार, 25 एप्रिल रोजी घरात कुणीही नसतांना दुपारी पंख्याला दोरीच्या मदतीने त्यांनी गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. वृद्धेच्या कुटुंबातील सदस्य घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. यावल ग्रामीण रुग्णालयात निर्मलाबाई यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार राजेश बर्‍हाटे करीत आहे.