न्यू फरक्का एक्सप्रेसचे ६ घसरले; ५ प्रवासी ठार

0

लखनौ-उत्तर प्रदेशमध्ये मधील रायबरेलीवरून दिल्लीला जाणाऱ्या न्यू फरक्का एक्सप्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले असून यात ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेखजण जखमी झाली आहे. हरचंदपुर स्टेशनपासून ५० मीटर अंतरावर हा अपघात झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये एका महिलेचा आणि लहान मुलीचा समावेश आहे. रूळाला तडे गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. आपघातानंतर घटनास्थळावर भितीचे वातारण निर्माण झाले होते. प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावर एनडीआरएफचं पथक पोहोचलं असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. एनडीआरफ पथकासह स्थानिक पोलिस आणि रूग्णवाहिका घटनास्थळावर दाखल झाली आहे. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी रेल्वेचे उपव्यवस्थापक, पोलीस महासंचालक, आरोग्यविभाग, आणि एनडीआरएफला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

Copy