न्यूयॉर्कहून सोनाली बेंद्रे लवकरच परतणार मायदेशी

0

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कला कॅन्सरचा उपचार करण्यासाठी गेलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच मायदेशी परतणार आहे. मुंबईत काही दिवसांसाठी विश्रांती घेऊन ती पुन्हा न्यूयॉर्कला उपचार घेण्यासाठी जाणार आहे अशी माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून सोनाली बेंद्रेनी शेअर केली होती.

कॅन्सरशी काही महिने यशस्वीपणे झुंज देऊन सोनाली त्यातून बऱ्यापैकी बाहेर पडली आहे. तेव्हा डॉक्टरांनी तिला काही दिवस विश्रांतीसाठी घरी परत जाण्याची परवानगी दिली आहे. या गोष्टीचा तिला प्रचंड आनंद झाला आहे. हा आनंद तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून व्यक्त केला आहे. ‘कधी कधी आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. पण जशी आपल्या घरापासून आपली अंतरं वाढत जातात तसतसं आपलं आपल्या घराशी नातं अधिक घट्ट होतं जातात. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना हाच धडा मी शिकले आहे’ अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबत अजून लढाई संपली नसल्याची जाणीवही तिने व्यक्त केली आहे. आपल्या जवळच्या माणसांना भेटल्यामुळे ती अधिकच ताकदीने कॅन्सरचा प्रतिकार ती करू शकेल असं मतं सोनालीने व्यक्त केलं आहे.