न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर

0

नवी दिल्ली । न्यूझीलंडविरुद्धच्या मिडलँड्स येथे 14 मेपासून सुरू होणार्‍या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 20 सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व आघाडीपटू राणीकडे सोपवण्यात आले आहे. संघात पुनरागमन करणार्‍या बचावपटू सुशिला चानूकडे उपकर्णधारपद दिले आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल साधला गेलेल्या या संघात बचावाची जबाबदारी दीप ग्रेस एक्का, उदिता, सुनीता लाक्रा, गुरजीत कौर, सुशिला चानू पुखरमबाम आणि नमिता टोप्पो यांच्यावर असेल.

लढण्यास सज्ज आहे सक्षम संघ
रितू राणी, लिमिमा मिन्झ, नवज्योत कौर, मोनिका, रेणुका यादव, निक्की प्रधान आणि रीना खोकर मध्यरक्षणाची जबाबदारी सांभाळतील. तसेच राणी (कर्णधार), वंदना कटारिया, प्रीती दुबे, सोनिका आणि अनुपा बार्ला यांचा आघाडीच्या फळीत समावेश आहे. बेलारूसविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने आरामात जिंकली होती.

भारतीय संघ खालील प्रमाणे
गोलरक्षक : रजनी ईटीमार्पू, सविता. बचावपटू : दीप ग्रेस एक्का, उदिता, सुनीता लाक्रा, गुरजीत कौर, सुशिला चानू पुखरमबाम (उपकर्णधार), नमिता टोप्पो. मध्यरक्षक : रितू राणी, लिमिमा मिन्झ, नवज्योत कौर, मोनिका, रेणुका यादव, निक्की प्रधान, रीना खोकर. आघाडीपटू : राणी (कर्णधार), वंदना कटारिया, प्रीती दुबे, सोनिका, अनुपा बार्ला.