नौदलातील हेलिकॉप्टर कोसळले

0

राजाली- भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर आज तामिळनाडूच्या राजालीमध्ये कोसळले. नियमित सरावासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलेले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झालेली नाही. हेलिकॉप्टरच्या रोटर्समध्ये बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानाला झालेल्या अपघातानंतर काही आठवडयात ही घटना घडली.

मागच्या महिन्यात चार सप्टेंबरला भारतीय हवाई दलाचे मिग-२७ फायटर विमान राजस्थान जोधपूरमध्ये एका शेतामध्ये कोसळले होते. सुदैवाने वैमानिक या अपघातात बचावला होता. जून महिन्यात गुजरात कच्छमध्ये हवाई दलाचे फायटर विमान कोसळले होते. या अपघातात भारताने आपले कुशल वैमानिक संजय चौहान यांना गमावले होते. नियमित सरावासाठी त्यांच्या विमानाने जामनगर हवाई तळावरुन उड्डण केले होते. या अपघातानंतर तीन दिवसांनी अहमदाबाद येथे हवाई दलाचे विमान कोसळले होते.

Copy