नोटाबंदी व सरकारच्या धोरणाविरुद्ध यल्गार

0

धुळे/शिरपूर/शिंदखेडा/नवापूर : मोठ्या नोटा चलनातून बाद केल्याने चलन टंचाई निर्माण झालेली आहे. सर्वसामान्यांच्या हाती दोन हजारांच्याच नोटा पडत आहे. त्यामुळे खरेदी करतांना सुट्टे पैशांची चणचण भासत आहे. विमुद्रीकरणामुळे मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. अनेक उद्योगधंदे रसातळाला गेले आहेत. सर्वाधिक हाल ग्रामीण भागातील शेतकरी व कामगार वर्गाचे होत आहेत. नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारासाठी उचलेले पाऊल पुरते फसल्याचा दावा करत राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने धुळे, शिरपूर, शिंदखेडा, नवापूरमध्ये सरकारच्या विरोधात मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले.

ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन
धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाने गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे. केवळ 50 दिवस त्रास सहन करा, मग परिस्थिती सुधारेल, असे खोटे आश्‍वासन पंतप्रधानांनी दिले. मात्र, पन्नास दिवसांचा कालावधी लोटूनही परिस्थिती जैसे थे आहे. आजही बँकांबाहेर गर्दी पहायला मिळत आहे. मोठ्या नोटा बाद करुन 2 हजार रुपयांची नोट सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसविण्यात आली. नोटाबंदीमुळे देश खड्ड्यात जात आहे. या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. सर्वसामान्य जनतेची या त्रासातून सुटका झाली नाही तर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातर्फे तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनाप्रसंगी धुळे शहराचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, ज्येष्ठ नेते एन.सी.आबा पाटील, एस.टी.महामंडळ संचालक किरण शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे,धुळे महापालिका महापौर कल्पना महाले,ज्योती पावरा,माजी महापौर जयश्री अहिरराव,जि.प.कृषी सभापती लिलाताई बेडसे,किरण पाटील,मोहन नवले,सुरेश सोनवणे,उपजिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सत्यजित सिसोदे, शहर जिल्हाध्यक्ष कांतीलाल दाळवाले, जिल्हा सरचिटणीस देवाबापू कोळी, विठ्ठलसिंग आण्णा, आधार पाटील, साक्री तालुकाध्यक्ष नरेंद्र तोरवणे, शिरपूर तालुकाध्यक्ष दिनेश मोरे,धुळे तालुकाध्यक्ष यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसतर्फे शिरपूर येथे थाळीनाद आंदोलन
शिरपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने निष्पक्ष चौकशी करावी व नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे असंख्य महिला व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिरपूर येथे सोमवार दि.9 जानेवारी रोजी दुपारी तहसिल कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येऊन तहसीलदार महेश शेलार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आ.काशिराम पावरा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा संगिता देवरे, माजी जि.प.अध्यक्षा सरला पाटील यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले. शासनासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा संगिता देवरे काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष शामकांत ईशी, शहराध्यक्ष नितीन गिरासे यांच्यासह शहरातील व ग्रामीण भागातून तसेच आदिवासी भागातून फार मोठ्या संख्येने महिला भगिनी, विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी, काँगे्रसच्या कार्यकर्त्या, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व उपस्थित महिला व पदाधिकारी यांनी नोटाबंदी व इतर अनेक निर्णयांविरुद्ध शासनाविरुद्ध घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी निवेदनात अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहारा आणि बिर्ला उद्योग समूहाकडून पैसे घेतल्याचे आरोप तसेच इतर अनेक आरोप करण्यात आले असून त्यांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.

शिंदखेडात काढली शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी हजार व पाचशेच्या नोटा बंद केल्या होत्या. त्यानंतर 50 दिवसात परिस्थिती सुधारेल, असे खोटे सांगून सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ दि.9 जानेवारी रोजी येथील तहसीलदार कचेरीवर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढून शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली तर काँग्रेस पक्षातर्फे महिला पक्षाच्या वतीने तहसीलदार कचेरीवर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. शासनाचा निषेध व्यक्त करण्यात करून राष्ट्रवादी व काँगे्रस पक्षातर्फे वेगवेगळे आंदोलन तहसीलदार कचेरीवर बघावयास मिळाले. दोन्ही पक्षातर्फे तहसीलदार गोपाल पाटील यांना निवेदन देण्यात आली. राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी आ.रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ नेते एन.सी.आबा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विठ्ठलसिंग गिरासे, महिला राकॉ जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, युवक जिल्हाध्यक्ष सत्यजीत सिरोदे, जिल्हा उपाध्यक्ष कलावती माळी, देविदास कोळी, अरुण देसले, किरण जाधव, शहराध्यक्ष प्रकाश चौधरी, डॉ.कैलास ठाकरे, प्रविण मोरे, तालुका युवक उपाध्यक्ष चेतन पाटील, प्रदीप पाटील, माजी सरपंच घनश्याम पवार, शाम पाटील, डॉ.संजय पाटील, छोटू पाटील, गुलाबराव पाटील, सुनिल लांडगे आदींसह शेकडो राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते. कॉग्रेस पक्षाच्यावतीने माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, जुई देशमुख (दोंडाईचा) आदींच्या नेतृत्वात आंदोलन तहसीलदार कचेरी समोर करण्यात आले. याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी, किशोर पाटील, महेंद्र निकम, कमलाकर बागल, राकेश पाटील, आबा पाटील, आदींच्या नेतृत्वात महिलांनी आंदोलन केले.

नवापुरात तहसीलदारांना दिले निवेदन
नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे झालेले आर्थिक नुकसानाबाबत व निषेध करणेबाबत चे निवेदन आज नवापूर तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी तर्फे पर्यवेक्षाधीन तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. निवेदनामध्ये म्हटले आहे की, या जुलमी कारभारामुळे असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले त्यात सर्वसामान्य जनता जेष्ठ नागरिक शेतमजुर व शेतकरी वर्ग मोठया प्रमाणावर भरडला गेला शेतमजुरांना मजुरीवर न जाता पैशांसाठी कित्येक तास बँकेच्या रांगेत उभे रहावे लागत आहे. 50 दिवसांत शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे त्याची भरपाई शासनाने करावी व शेतकऱ्यांचे कर्ज तसेच विजबिलही माफ करावे अन्यथा मोठया प्रमाणावर जनआंदोलन उभे करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे म्हटले आहे. आंदोलनाला आम आदमी पार्टीचे मंगेश येवले यांनी पाठींबा दिला. यावेळी माजी आमदार शरद गावीत, माजी जि.प सदस्य, राया मावची, एम. एस. गावीत, जिल्हा सरचिटणीस अमृत लोहार, तालुका अध्यक्ष विनायक गावीत, मनोज वळवी,शरद पाटील, न.पा विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, इम्तियाज लाखानी, इद्रिस पठाण, नगरसेवक शिरीष प्रजापत, सुरज गावीत, संजय शिंदे, संदिप अग्रवाल, सरपंच गिरीष गावीत यांसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.