नोटबंदीमागील उद्देश असफल-ओ.पी.रावत

0

नवी दिल्ली-मुख्य निवडणूक आयुक्त पदावरुन सेवानिवृत्त होणारे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे उद्दिष्ट साध्य झाले नसल्याची टीका केली आहे. नोटाबंदीचा काळा पैशावर काही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान आयोगाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांदरम्यान आम्ही जप्त केलेली रक्कम जवळपास २०० कोटी होती, असे रावत यांनी सांगितले. यावरुन निवडणुकीदरम्यान येणारा पैसा हा प्रभावी लोकांकडून येत असून, अशा प्रकारच्या निर्णयांचा त्यांच्यावर काही परिणाम होत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे असे रावत म्हणाले.

ओ पी रावत यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला फोल ठरविणारे आहे.

Copy