नोटबंदीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले;कृषी विभागालाही मान्य-राहुल गांधी

0

नवी दिल्ली-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाना साधला आहे. खुद्द कृषी मंत्रालयाने देखील नोटबंदीमुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली असल्याचे मान्य केले आहे असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत हे आरोप केले आहे.

नोटबंदीने कोट्यावधी शेतकऱ्यांचे जीवन नष्ट केले आहे, शेतकऱ्यांकडे आता बियाणे खरेदीला देखील पैसे नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांची खिल्ली उडवत आहे असे आरोपही राहुल गांधी यांनी केले आहे.

Copy