Private Advt

नोकरीच्या आमिषाने विवाहितेस सुरतेत पळवून लुटले

0

मुक्ताईनगरातील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल ; विश्‍वासघाताने दागिनेही काढले

मुक्ताईनगर- शहरातील 19 वर्षीय विवाहितेस नोकरीच्या आमिषाने सुरत येथे पळवून नेत तिच्या अंगावरील सात हजार 600 रुपये किंमतीचे दागिने लांबवल्याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 13 ऑगस्ट रोजी उधना (सुरत) येथे गीता भास्कर सोळंके (19, रा.प्रभाग क्रमांक 12, मुक्ताईनगर) या महिलेच्या फिर्यादीनुसार प्रभागातील रहिवासी तथा संशयीत आरोपी रेखा विजय सावळे व तिचा पती विजय सावळे (दोघे रा.प्रभाग क्रमांक 12, मुक्ताईनगर) यांनी उधना सुरत येथे 20 हजार रुपये महिन्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत मुक्ताईनगर येथून उधना (सुरत) येथे पळवून नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध तिला 3 ऑक्टोबरर्पर्यंत डांबून ठेवले. याच दरम्यान तिच्या अंगावरील सात हजार 600 रुपये किमतीचे दागिने खोटे बोलून विश्वासघाताने काढून घेतले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून धिक तपास पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास भारसके करीत आहे.