Private Advt

नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

लष्करातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याला 42 हजारांचा तर बेरोजगाराला 45 हजारांचा गंडा

भुसावळ : नोकरी लावून देण्याच्या भुसावळातील लष्करातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याला 42 हजारांचा तर बेरोजगार तरुणाला 45 हजारांचा गंडा घालण्याच्या दोन घटना शहरात घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी बाजारपेठ व शहर पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून नागरीकांनी अनोळखी व्यक्तींना पैसे पाठवू नयेत तसेच बँक खाते, आधारकार्ड, पॅनकार्डची मााहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.

नोकरीच्या आमिषाने बेरोजगाराला गंडा
भुसावळ :
शांती नगरातील रहिवासी शुभम अजय पाटील (20) या बेरोजगार तरुणाला 14 जून रोजी सायंकाळी 7302181754 या क्रमांकावरील जसिका सिंग नामक तरुणीने नोएडाच्या हायर हंडर कंपनीतून बोलत असल्याचे सांगत गोदरेज अ‍ॅण्ड बॉईज कंपनीत जॉब मिळाल्याचे सांगत रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यासाठी लिंग पाठवण्यात आली व रजिस्ट्रेशन करून त्यसाठी फी 150 रुपये भरल्यानंतर 16 रोजी पुन्हा रजिस्ट्रेशन व्हेरीफिकेशनसाठी दोन हजार 200 रुपये, जॉब इन्शुरन्ससाठी पाच हजार पाचशे रुपये, खाते उघडण्यासाठी दहा हजार रुपये तसेच जॉब बॉडींगसाठी 15 हजार रुपये व फाईल अप्रुव्ह करण्यासाठी 12 हजार रुपये उकळण्यात आले. 19 रोजी पुन्हा संबंधितानी तरुणाला खाते ब्लॉक झाल्याने ते अनलॉक करण्यासाठी 20 हजार रुपये मागितले असता तरुणाने आधीचे भरलेले पैसे मागितले मात्र आधी रक्कम पाठवा, नंतर पैसे परत करू, अशी भूमिका संबंधितानी घेतल्याने तरुणाला फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्याने शहर पोलिसात धाव घेतली. 48 हजार 850 रुपये वेळोवेळी उकळून फसवणुक केल्याप्रकरणी जसिका सिंग (नाव, गाव माहित नाही, मो.9105973842) विरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.