नोकरीच्या आमिषाने थेरगावातील एकाची फसवणूक

0

वाकड : चांगल्या कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका युवकाची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार जुलै 2016 ते ऑगस्ट 2016 दरम्यान अशोका सोसायटी, काळेवाडी फाटा थेरगाव येथे घडला. याप्रकरणी अमन, प्रशांत नामक दोघांसह एका मोबाईलधारकाविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील ढमक (वय 36, रा. काळेवाडी फाटा, थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ऑनलाईन पद्धतीने पैसे उकळले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी असलेल्या अमन, प्रशांत व एका मोबाईलधारकाने सुनील ढमक यांना चांगल्या कंपनीत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी आरोपींनी सुनील याच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत ऑनलाईन पद्धतीने पैसेही घेतले. पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी सुनील याला नोकरीस लावले नाही. दरम्यानच्या काळात आरोपींनी त्याच्याकडून 40 हजार 844 रुपये ऑनलाईन पद्धतीने उकळून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुनील याने आरोपींविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.