नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास कोठडी

0

जळगाव | नाशिक येथील पीडब्ल्युडी विभागात नोकरीचे अमिष दाखवून फसवणुक करणार्‍या एका संशयिताला आज शहर पोलिसांना मुंबई येथून अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता, त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टागोर नगरातील लिलाधर प्रकाश बोरनारे यांना नाशिक पीडब्ल्युडी विभागात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून त्याची १७ लाखात फसवणुक केल्याप्रकरणी चौघांविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आज शहर पोलिसांनी संभाजी श्रीरंग सावंत उर्फ पाटील साहेब रा. बदलापूर यांना मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला ८ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे ॲङ स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.