नैसर्गिक आपत्ती मुळे पाणी साचलेला प्रथमोपचार विभाग अवघ्या 24 तासात रुग्ण सेवेत पून्हा सुरू

1

जळगाव– काल सकाळी डॉ उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये पावसाचे पाणी आत शिरले होते आणि संभ्रमित करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. ही घटना घडल्याचा काही तासातच स्वतः डॉ उल्हास पाटील हे घटनास्थळी हजर झाले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली व 24 तासाच्या आत हा वॉर्ड स्वच्छ व सॅनेटाईझ करून परत सुरू झाला आहे.

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ज्या प्रमाणात पाणी हॉस्पिटलमध्ये घुसले होते ते पाहून अस वाटत होतं की 4 ते 5 दिवस हा विभाग सुरू होणार नाही. पण हॉस्पिटल प्रशासन हे तातडीने कामाला लागून लगेच जेसीबी बोलावून व रविवार सुटीचा दिवस असताना सर्व स्टाफ बोलावून अवघ्या 24 तासात अपघात विभाग सुरू केलेला आहे. याबाबत सर्व माहिती हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांनी देताना हॉस्पिटल व्यवस्थापक आशिष भिरुड,नर्सिग स्टाफचे कोमल लांडगे, शिवानंद बीरादार यांचे विशेष सहकार्य लाभले. तर प्रवीण कोल्हे, संकेत पाटील व इतर स्टाफ तसेच कन्ट्रक्शन विभागाचे संजय भिरुड व एन.जी चौधरी त्यांचा स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Copy