नेत्यांवर राजकीय आकसाने कारवाई : आमदार रोहित पवार

मुक्ताईनगर शहरात आदिशक्ती मुक्ताईचे घेतले दर्शन

मुक्ताईनगर : राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेली कारवाई ही राजकीय आकसाने करण्यात येत असून माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा नाहक त्रास दिला जात आहे. त्यातून ते सहि-सलामत बाहेर येतील, असा विश्वास असल्याचे आमदार रोहित पवार येथे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी मुक्ताईनगरात शुक्रवार, 22 रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी मुक्ताई मंदिरात जाऊन आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले.

खडसे परीवारामुळे ताकद वाढणार
मुक्ताई दर्शनानंतर आमदार पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील वृंदावन या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले माजी मंत्री एकनाथराव खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या भागात पक्षात नवचैतन्य आले आहे शिवाय आगामी निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे पक्षाची ताकद अधिक वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षात नवे व जुने गट-तट न मानता येथील सर्व कार्यकर्ते एकदिलाने पक्षाचे काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

एकदिलाने काम करून निवडणुकीत विजय मिळवावा
गुरुवारी जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची बाब कौतुकास्पद असून आगामी काळात जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत निश्चित पक्षाला घरघोस यश मिळणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने मेहनत घ्यायची असल्याचे ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, सोशल मिडिया सेल जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, पंचायत समिती सभापती विकास पाटील, किशोर गायकवाड, युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, युवक उपाध्यक्ष पवन पाटील, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, शहराध्यक्ष राजु माळी, महिला आघाडी शहराध्यक्ष निता पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष नंदकिशोर हिरोळे यांच्यासह सर्व सेलचे पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

Copy