नेटफ्लिक्सच्या नव्या सिरीजमध्ये महेश मांजरेकर

0

मुंबई-नेटफ्लिक्सने नुकतीच नव्या वेब सीरिजची घोषणा केली आहे. या नव्या वेब सीरिजमध्ये महेश मांजरेकर झळकणार आहेत. अरविंद अदिगा यांच्या ‘सिलेक्शन डे’ या कादंबरीवर आधारित ही वेब सीरिज असणार आहे. या वेब सिरिजचं नाव ‘सिलेक्शन डे’च असणार आहे.

वडिलांच्या कडक शिस्तीत आणि धाकात वाढलेल्या दोन भावांची कथा ‘सिलेक्शन डे’मध्ये पाहायला मिळणार आहे. स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी चाललेली धडपड, प्रेम आणि महत्त्वकांक्षा असे अनेक पैलू दोन भावांच्या कथेत पाहायला मिळणार आहे.

महेश मांजरेकर यांच्यासोबत रत्ना पाठक, राजेश तायलंग, यश ढोले, मोहम्मद शामद असे अनेक कलाकार या वेब सीरिजमध्ये असणार आहे. अभिनेता अनिल कपूर या चित्रपटाचा सहनिर्माता असणार आहे. ‘सेर्केड गेम्स’ , ‘घोल’नंतर नेटफिक्सच्या नव्या सीरिजला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखं ठरेल. २८ डिसेंबरला ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

Copy