नुरानी नगरात धाडसी घरफोडी : 66 हजारांचा ऐवज लांबवला

Daring House Burglary in Nurani town of Bhusawal : Compensation Of 66 Thousand Extended भुसावळ : शहरातील नुरानी नगर भागातील रहिवासी शेख नाजीम शेख लतीफ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील सोन्याचे दागिन्यांसह 66 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना सोमवारी दुपारी 1.45 ते सायंकाळी पाच या काळात घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
नुरानी नगरातील रहिवासी शेख नाजीम शेख लतीफ हे बाहेर गेले असल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. हीच संधी साधन चोरट्यांनी साधली. सोमवारी दुपारी 1.45 ते सायंकाळी पाच या काळात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. व घरातील सोन्याचा हार, कानातील कर्णफूल, सोन्याची अंगठी असा सुमारे 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार जितेद्र पाटील पुढील तपास करीत आहे.