नीमच्या विवाहितेने मुलीसह विहिरीत केली आत्महत्या

Suicide of a married woman with a child in Amalner Taluka अमळनेर : तालुक्यातील नीम गावातील 30 वर्षीय विवाहितेने आपल्या आठ वर्षीय चिमुकलीसह विहिरीत आत्हत्या केली. दसर्‍याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्यचेे कारण अस्पष्ट
निम, ता.अमळनेर येथील रहिवासी जयश्री समाधान कोळी (30) व त्यांची मुलगी नंदिनी समाधान कोळी (7) अशी मयत माय-लेकींची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. दोन्ही मायलेकींनी मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास कळमसरे शिवारातील सबस्टेशन जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मारवड पोलिसात नोंद
मारवड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश खलाने करीत आहेत.