निष्क्रीय पोलीस व्यवस्थेचा धाक संपला

0

अमळनेर : पातोंडा येथील शेतकरी कुटूबसह गावातील इतर चार ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली, यात चार घटनांमध्ये घरांचे कुलूप तोडून चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत दिलेल्या माहिती वरूण विनोद आत्माराम दिसले ह्यांचे दुमजली घर आहे. ते त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घराच्या खालच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी खालच्या मजल्यावर कोणीनसल्याचा फायदा घेवून सोन्यांचे दागिनीने चोरून नेले. चोरट्यांनी यावेळी 300 गॅम सोने (30 तोळे ) चोरून नेले. यात सोन्याच्या अंगठ्या, मंगल पोत, पाटल्या, चैनी, आंगठ्या, लहान मुलांचे दागिने चोरून नेले आहेत.एकुण 4 लाख 31 हजार 100 रूपयांचा मुद्दे माल चोरीस गेली आहे. अमळनेर पोलिस स्टेशन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नविन वर्षाच्या सुरवातील पोलिसाना चोरांनी एकाच रात्रीतून पाच ठिकाणी घरफोड्या करून पोलिसांना आव्हान दिले आहे.पोलिस थंडीमुळे सुस्थ झाल्याची गावकर्‍यामुळे चर्चा रंगली होती.

भरवस्तीत घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
एकाच रात्रीत एका गावात पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या यावरून पोलिसांचा धाक संपला असून चोरट्यांना मोकळे रान मिळत आहे.गावकर्‍यांनी दिवसभर याबाबत चर्चा रंगली होती थंडी असल्याने पोलिस गस्तीवर निघत नाही आहे.त्यामुळे पोलिस थंडी गाढ झोप घेत आहे.त्यामुळे चोरटे यांचा फायदा घेत आहे. पोलीस व्यवस्था निष्क्रीय असल्यामुळेच व अवैध व्यवसायांचे हप्ते गोळा करण्यातच ते व्यस्त असल्याने अशा गुन्हेगारांना मुभा मिळते अशी चर्चा गावातून होत आहे. या आधी गावातील गजानन बिरारी यांचा रोटाव्हेटर चोरले गेले व त्यानंतर सुनिल बिरारी यांची ट्रॉली चोरली गेली होती परंतु यांचा अद्याप तपास लावण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे म्हणून चोरटयांची हिंमत वाढते अशी चर्चा गावातून सुरू आहे.आता तरी पोलीसांच्या हाती यश लागेल का अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. सदर ऐन वस्तीत झालेल्या घरफोडयांमूळे ग्रामस्थ व महिलांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोटारसायकलही पळविली
एकाच रात्रीत अज्ञात दरोडेखोरांनी पाच ठिकाणी दरोडा घातला. बस स्टँड जवळील रमेश सुकदेव पवार यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी सहा हजार रूपये रोख रक्कम पळवली, अर्जुन बोरस हे बाहेरगावीे गेले असल्याने घरातून पाच हजाराचा ऐवज लंपास केला, दूध उत्पादक सोसायटीचा दरवाजा व कपाट तोडून एकोणतीस हजार रूपये चोरीला गेल्याची माहीती सेक्रेटरी निंबा बोरसे यांनी दिली, त्यानंतर गावातील आत्माराम महादू देसले यांच्या घराचा दरवाजा तोडून आतील तीन ते चार कपाटे तोडून त्यातील पस्तीस तोळा सोने , वीस तोळे चांदी व काही रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांनी सांगीतले. सदर दोन्ही परीवार हे रात्री वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले असता खालच्या मजल्यावर ह्या घरफोड्या झाले आहे. पळून जाण्यासाठी बाबूलाल राजाराम बिरारी यांची शाईन मोटर सायकल सुध्दा चोरून नेली होती, घटनेची माहीती मिळताच डीवाय एसपी रमेश पवार, एपीआय साळूंखे, यांनी पंचनामा केला. जळगाव येथील श्वानपथक पाचारण करण्यात आले आहे. पुढील तपास एपीआय साळूंखे , ज्ञानेश्वर जवागे, महेश वंजारी व संजय पाटील हे करीत आहेत