निवडून आल्यास संपूर्ण गटाचा विकास करणार

0

रावेर । जिल्हा परिषदेच्या निंभोरा-तांदलवाडी गटामधून जिल्हा बँकेचे संचालक नंदकिशोर महाजन हे भाजपातर्फे निवडणूक लढवित आहे. यापुर्वी त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्या गणात अनेक योजना, शेतकरी, मजूर, महिला वर्गासाठी दिलेले आहे आणि आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात असून केलेले विकास व सर्वसाधारण जनतेची असलेल्या साथमुळे महाजन यांचा प्रचार सुरु आहे. मी नक्की निवडून येईल, असे महाजन यांनी सांगितले. निवडून आल्यास संपूर्ण गटाचा विकास करुन असे आश्‍वासन महाजन यांनी दिले.

गटाचा विकास शंभर टक्के
जिल्हा परिषदेच्या निंभोरा-तांदलवाडी गटातून निवडणूक लढवित असून भाजपाची राज्यात, जिल्ह्यात सत्ता असल्याने निवडून आल्यास शंभर टक्के विकासावर भर देणार असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्‍न सोडविणार, शेती, रस्ते, दलित वस्तीची कामे, बुध्दविहार, समाज हॉल, गटातील सर्व शिवरस्ते तसेच गरीब नागरिकांना रेशन कार्ड, संजय गांधी योजनेचा लाभ, अंगणवाड्या, वाचनालये यावर भर देणार असल्याचे भाजपाचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी सांगितले.

हायटेक प्रचार व युवक ज्येष्ठांचा पाठिंबा
नंदकिशोर महाजन यांचा संपूर्ण गटामध्ये प्रचाराचा झंझावात सुरु असून जागोजागी औैक्षणसुध्दा होत आहे. तर युवकांचा त्यांना भरभरुन पाठिंबा मिळत आहे. नागरीक व ज्येेष्ठांमध्ये महाजन चर्चेचा विषय झाला आहे. प्रचारात सुध्दा हायटेक पध्दतीने सुरु असून होम टू होम प्रचारावर महाजन भर देत आहे. सर्व समाजाशी ठेवलेले जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे ते उमेदवारी करीत आहे.