निवडणूक खर्चाचा तपशील सादर न केल्यामुळे अडचणी

0

भुसावळ । जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत नामनिर्देशन पत्र सादर केल्यानंतर संबंधित उमेदवारांनी आपला खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे नियमितपणे सादर न केल्यामुळे भाजपाच्या कुर्‍हे – वराडसीम गटातील उमेदवार पल्लवी सावकारेंसह 18 उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी चिंचकर यांनी नोटीस बजावली आहे.

यांचा आहे समावेश

यामध्ये हतनूर गणातील काँग्रेसच्या उमेदवार अलका भिल, राजेंद्र वाघ, सुरेखा भारंबे, माधुरी पाटील, अल्का सपकाळे, मनिषा सुरवाडे, माधुरी सुर्यवंशी, पल्लवी सावकारे, रईस खान, कुर्‍हे प्र.न. गणातील अपक्ष उमेदवार नारायण सपकाळे, हतनूर गणातील शिवसेना उमेदवार संतोष सोनवणे, तळवेल गणातील भाजपा उमेदवार सुधाकर सुरवाडे, तळवेल गणातील शिवसेना उमेदवार विजय सुरवाडे, नाना पवार, किरण कळस्कर, वराडसीम गणातील अपक्ष उमेदवार सुनंदा मावळे, शैलेंद्र पाटील, विद्या सोनवणे या उमेदवारांनी आपल्या निवडणूकीचा खर्च तपशील सादर न केल्यामुळे त्यांना निवडणूक निर्णय अधिकार तथा प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी नोटीस दिल्या आहे.