निवडणूक आयोग सोशल मिडीयावरील समस्येबाबत गंभीर-सुनील अरोरा

0

नवी दिल्ली-देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी काल पदभार स्वीकारला. ओ.पी.रावत यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या निवडणुकीबाबत सोशल मिडीयावर कोणत्याही प्रकारची आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते. याबाबत निवडणूक आयोगाने गंभीर भूमिका घेतली असून सोशल मिडीयाबाबत निवडणूक आयोग गंभीर असल्याचे नवनियुक्त मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.

सोशल मिडीयाबाबत अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल देईल त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असेही अरोरा यांनी सांगितले. ‘पीपल्स अॅक्ट १९५१ च्या कलम १२६ बाबत विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. डिसेंबर २०१८ अखेर अहवाल प्राप्त होणार आहे.