निवडणूक आयोगाने केली पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

0

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि मिझोराममधील तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून निवडणुकांची घोषणा होताच या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. तर तेलंगणमध्ये १२ ऑक्टोबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये १५ डिसेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान १२ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान २० नोव्हेंबरला होणार होईल. तर २८ नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये मतदान होणार. तर ७ डिसेंबरला राजस्थान आणि तेलंगणमध्ये मतदानर होणार आहे. ११ डिसेंबरला मतमोजणी होऊन सर्व राज्यांचे निकाल लागतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी दिली.

Copy