Private Advt

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा : नगरपंचायत व नगरपरीषद सदस्यपदासाठी 13 जूनला आरक्षण सोडत

मुंबई : गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील 216 नगरपरीषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करताच यंत्रणा कामाला लागली आहे. 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल होतील शिवाय आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

लवकरच होणार निवडणुका
मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे तर 13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत निघेल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे.