निवडणूकीत पराभूत झालेल्या 13 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

0

भुसावळ । नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारी लढविणार्‍या 13 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याची नामुष्की ओढविली आहे.

जिल्हा परिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अन्वये प्रत्यक्ष निवडणूक लढवून एकूण वैध मतांच्या एक अष्टमांश पेक्षा कमी मते मिळाल्याने उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात येऊन ती चलनाने जमा करण्यात आली आहे. यामध्ये साकेगाव कंडारी गटातील ज्ञानेश्‍वर आमले, शिवसेनेचे लालाराम जंगले, हर्षल नारखेडे, भुषण पाटील, यशवंत मोरे, हतनूर-तळवेल गटात अन्नपुर्णा पाटील, कुर्‍हे – वराडसिम भारती पचेरवाल, साकेगाव गणातील शेख जैतुन युसूफ, हतनूर गणात सुनिल पवार, अलका भिल्ल, तळवेल गणात शैलेश बोदडे, उत्तम सुरवाडे, शैलेंद्र सोनवणे यांचा समावेश आहे.