निवडणुकीनंतर गाळे जप्तीची कारवाई

0

तिन्ही उपायुक्तांचे असणार पथक

जळगाव-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील ज्या गाळेधारकांनी थकीत रकमेचा अद्यापपर्यंत भरणा केलेला नाही अशा गाळेधारकांवर निवडणुकीनंतर क लम 81 ’ब’ ते 81 ’ई’ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.त्यासाठी आयुक्तांनी तिन्ही उपायुक्तांना प्राधिकृत केले असून पथक देखील नेमण्यात आले आहे.

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी प्रशासनाने 81 ‘क’ची नोटीस बजावून 11 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला होता.त्यानुसार महात्मा फुले व्यापारी संकुलात कारवाई करण्यासाठी उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांचे पथक गेले होते.त्यावेळी पाच गाळे सील करण्यात आले. मात्र वाद निर्माण होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तृर्तास प्रशासनाने कारवाई थांबवली आहे. निवडणुकीनंतर कारवाईचा धडाका लावण्यात येणार असल्यामुळे आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी उपायुक्त उत्कर्ष गुट्टे,अ जित मुठे आणि मिनीनाथ दंडवते या तिन्ही उपायुक्तांना कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.दरम्यान,स्वंतत्र तीन पथक देखील नेमण्यात आले आहे.तसेच पोलीस बंदोबस्त देखील मागविण्यात आला आहे.

Copy