निवडणुकीच्या काळात तालुक्यातून दोन हद्दपार

0

एरंडोल । तालुक्यातील रवंजे बु. येथील नाना उर्फ उत्तम बुधा कोळी व समाधान पितांबर कोळी या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन व्यक्तींना जिल्हा परिषद व पं.स.निवडणुकीच्या काळात एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्या अहवालावरून प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी दिलेल्या नोटीसानुसार तालुक्यातून दहा दिवस हद्दपार करण्यात आले आहे. एरंडोल पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या माहिती नुसार सदर व्यक्तीमुळे निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच या व्यक्तींना मतदानावेळी मतदान करण्याचा अधिकार असल्याचेही सांगण्यात आले. सदर व्यक्ती ह्या 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017 दरम्यान हद्दपार राहणार असल्याची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे.