निलेश शिंदे हा आदर्श कार्यकर्ता: जयंत पाटील

0

कोथरुड: निलेश शिंदे हा कोथरुड भागात लोकोपयोगी काम करणारा एक आदर्श कार्यकर्ता आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निलेश शिंदे यांचे कौतुक केले. पुणे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष निलेश शिंदे यांच्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर, विद्यान नगरसेवक दीपक मानकर, चेतन तुपे , नथु शिंदे, दीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, करण मानकर, मंदार शिंदे, तृप्ती शिंदे, विजय डाकले, महेश हांडे , स्वप्नील दुधाने , प्रमोद शिंदे, शुभम माताळे, आदित्य धनवडे, त्रिमुर्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते, उपस्थित होते.

लोकांच्या संपर्कासाठी पक्षाच्यावतीने कार्यालय सुरु केले आहे. भविष्यकाळात या कार्यालयातून लोकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतील असा विश्वास असल्याचे मंत्री जयंत पाटीलांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तान, ज्येष्ठ नागरीकांचे वीज बील, मालमत्ता कर भरण्याची व्यव्स्था, नळ दुरुस्ती अशी कामे मोफत करणार आहे.

Copy