निर्दयी कसाब; पाणी पाजणाऱ्याला देखील गोळ्या घालून केले ठार !

0

मुंबई-समुद्र मार्गे पाकिस्तानातील १० दहशतवादी २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईत घुसले. त्यांनी मृत्यूचा तांडव माजविला होता. दहशतवाद्यांनी ताजमहल, नरीमन हाउस, ऑबेरोय हॉटेल, सीएसटी टर्मिनन्सवर हल्ला केला. या हल्ल्यात १६६ लोक ठार झाले होते.

अनेकांनी ही घटना डोळ्याने पहिली आहे.यातील ५० वर्षीय महिला जमुना वाघेला यांच्या मुलाकडून ठाकूर वाघेला (३२) याच्याकडून अजमल कसाबने पाणी मागितले होते, ज्या ठाकूर वाघेला कडून कसाबने पाणी पिले त्यालाच त्याने ठार केले. इतका निर्दयी कसाब होता. ठाकूर दक्षिण मुंबईतील सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारी होता.

जमुना वाघेला यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. रात्री १० वाजता जमुना वाघेला झोपडीच्या बाहेर उभ्या होत्या. ठाकूर आणि जमुना वाघेला यांचा नातू जेवण करत होते. तेंव्हा कसाब आणि इस्माइल हे दोन व्यक्ती झोपडीजवळ आले. मी कसाबला काय हवे असे विचारले. त्यातील इस्माईलने माझ्यावर गोळ्या झाडल्या. मात्र मी सुदैवाने वाचली. त्यानंतर कसाबने पाणी मागितले, ठाकूरने पाणी दिले, त्यानंतर कसाबने ठाकूरला गोळी घातली.

Copy