निरोगी शरीर हाच स्त्रियांसाठी खरा दागिना

0

चाळीसगाव । सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त जिवन जगणे हे सर्वासाठी आव्हान ठरत आहे. परिवारांसाठी जीवन जगत असतांना महिलांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. निरोगी शरीर हाच स्त्रीयांसाठी सर्वात सुंदर दागिना आहे. असे प्रतिपादन आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद कोतकर यांनी केले. ते छाया ‘दी ग्राम सोसायटी’ परिसरातील महिला मंडळातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात केले. पैसा ही समृध्दी नसून सुदृढ आरोग्य हीच मोठी श्रीमंती आहे. आजची महिला सामाजिक, कौटूंबिक, नोकरी-व्यवसाय आदी प्रकारच्या जबाबदार्‍या सांभाळून असते. जबाबदार्‍या पार पाडतांना स्वत: च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असते. परिणामी महिलांना अनेक आजारांना बळी पडावे लागते.

सद्य स्थितीत ७२ टक्के महीलांमध्ये रक्ताची कमतरता आहे. स्तनांचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर या विषयी महिलांमध्ये जनजागृती होण्याची गरज मत त्यांनी पुढे बोलतांना नमुद केले. प्रास्ताविक महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती देशमुख यांनी केले. यावेळी अलका देशमुख, मनिषा पवार, सुशिला देशमुख, कल्पना शिंदे, सायली अहिरे, शुभांगी देशमुख, शशी जोशी, कविता राठोड, मंदाकिनी राजपूत, मंगल वाघ, मिताली बुदेलखंडी, ज्योती शेलार, स्नेहा अग्रवाल, नुतन कोतकर, सविता कोतकर, नयना खैरनार, माया पाटील, डॉ. सारीका राठोड, सुवर्णा निकम, मनिषा अग्रवाल, संगिता छाजेड, भारती भामरे, वंदना भोसले, शेफाली पंजाबी, संगिता छाजेड, जोशीला राठोड, श्रध्दा गुप्ता, विद्या पाटील, शिल्पा जाधव, सुधा अग्रवाल, गिता राठोड, निशा चव्हाण, इंदुमती भालेराव, पुजा शितोळे, अंजली बोरे, यांच्या सह परिसरातील महिला उपस्थित होत्या. उज्वला शिंदे यांनी आभार मानले.