निरामय अ‍ॅपद्वारे पोलिसांचा अपर पोलिस अधीक्षकांकडून आढावा

1

जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले तसेच अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला ऑक्सीमीटर तसेच इन्फ्रारेड थर्मामीटर पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या तपासणीसाठी दिले आहे. सर्व पोलिस स्टेशनला मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर तसेच आयुर्वेदिक गोळ्या, आयुष्य मंत्रालय द्वारा निर्मित काढा यांचे वाटप करण्यात आले आहे.

निरामय अ‍ॅपद्वारे दररोज आढावा
निरामय अ‍ॅपद्वारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना अ‍ॅड करण्यात आले असून दररोज सर्वांचा रीपोर्टद्वारे आढावा घेण्यात येतो. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करून आपुलकीने विचारपूस करीत असल्याने पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Copy