निमित्त शिववंदनेचे; आवाका हिंदवी स्वराज्याच्या वास्तवाचा!

0

जळगाव । छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजची तरूण पिढी विसरत असल्यामुळे तरूणांना मार्गदर्शक ठरेल असे काम करण्याचे उद्दीष्ट ठेऊन स्थापन झालेल्या स्वराज्य निर्माण सेनेने ‘शिव वंदना’ हा उपक्रम जिद्दीने जळगावात सुरु केला. निमित्त शिववंदनेचे; आवाका हिंदवी स्वराज्याच्या वास्तवाचा, या ध्येयाप्रती समर्पित मावळ्यांची फौज उभी केली. सांगली येथील श्री. शिवप्रतिष्ठानच्या कार्यातील गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी ‘हिंदवी स्वराज्य’ची स्थापना रायगड किल्ल्यावर केली त्यानुसार ‘स्वराज्य निर्माण सेना’ही रायगडावरच स्थापन करण्यात आली. ‘स्वराज्य निर्माण सेने’मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात शिववंदनेचा उपक्रम राबविणार असून सुरूवात जळगाव, चिंचोली, अहमदनगरसह इतर शहरात करण्यात आली. आर्थिक बळ उभे राहण्यासाठी संघटनेने ‘शिवगंध’ ढोल पथकाची निर्मीती करून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

12 जानेवारी 2013 पासून अखंड शिववंदना
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना कशी टक्कर दिली यासह इतर गोष्टीची माहिती आजच्या युवकांना व्हावी, इतिहास त्यांच्या लक्षात राहावा यासाठीच स्वराज्य निर्माण सेनेच्या माध्यमातून शिववंदना हा कार्यक्रम आयोजित करून शिवाजी महाराजांच्या कार्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न आहे. 12 जानेवारी 2013 पासून या संघटनेच्या माध्यमातून शिववंदना शहरातील शिवतीर्थ मैदानावर सुरू झाला. त्यादिवसांपासून हा उपक्रम अखंड सुरू आहे. उन, वारा, पाऊस व थंडीची पर्वा न करता हा उपक्रम संघटनेमार्फत राबविली जात आहे.

स्वराज्य निर्माण सेनेचे इतर उपक्रम

सगळीकडे 26 जानेवारीरोजी प्रशासकीय अधिकार्‍यांचा व मान्यवरांचा सत्कार केला जातो. यात प्रामुख्याने वरिष्ठ अधिकर्‍यांचा समावेश असतो. स्वराज्य निर्माण सेना मात्र 26 जानेवारीरोजी कामावर उपस्थित राहणार्‍यांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबवित आहे. यात अग्नीशमन कर्मचारी, टपाल कर्मचारी, मनपाचे सफाई कर्मचारी, पोलिस कर्मचारी, वैद्यकिय अधिकारी, नर्स व इतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला जातो. शहरातील शिवस्मारकाची दुरावस्था झाली असून स्मारकाच्या परीसराची पडझड झाली होती पायाचे खच्चीकरण होत असतांना पायाचे मजबुतीकरण केले. तेथे शोभिवंत रोपे लावली, शिवजयंती दिनी पुतळ्याची विटंबना होणार नाही याची आम्ही दखल घेत आहोत.

‘शिव गंध’चे सदस्य करतात रोज तीन तास सराव
स्वराज निर्माण सेनेला कोणतेही आर्थिक बळ नसल्यामुळे शिवगंध ढोल पथकाची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांत प्रत्यक्ष सहभाग नोंदवत असून सदस्य कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता काम करीत आहे. शिवगंध हे सांस्कृतिक पथक असून पुण्याचे ढोल जळगावात आणले आहे. नवरात्री व गणोशोत्सवात सक्रिय सहभाग असतो. आज 55 ढोल आहेत. त्यात 18 ताशे, एक टोल गाडी, झांज पथक, स्वतःचे ध्वज पथक आहे. पुण्याचेही एक ध्वजपथक आणण्याचा प्रयत्न मानस आहे. पथकातील अनेकांना प्रशिक्षणाची गरज आहे. त्यामुळे बाहेरून प्रशिक्षक बोलावणार आहे. शहरातील अनेकाचा सहभाग व मदतही मिळत आहे. ढोल पथकाचे वैशिष्ट्य असे की, सर्व ढोल चामडी असून फायबरचे नाहीत. सांस्कृतिक कार्यक्रमापासून विसर्जन मिरवणूक, दहिहंडी, हनूमान जयंती, रामनवमी, गणेशोत्सव, दुर्गोत्सव या उत्सवात सहभाग नोंदवला जातो.

नेमकी काय आहे ‘शिव वंदना’?
ज्या पद्धतीने घरात देवांची आरती केली जाते त्या पद्धतीने तरूणांच्या लक्षात राहिल अशी शिवाजी महाराजांची आरती केली जाते. हा कार्यक्रम 15 मिनिटांचा असून त्यात मंत्र म्हटल्यावर घोषणा दिल्या जातात, मुजरा केला जातो, नंतर श्रीगणेशाची आरती, स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित शिवाजी महाराजांची आरती होते, प्रेरणा मंत्र होतो, त्रिवार मुजरा, पुन्हा घोषणा होतात .

स्वराज्य निर्माण सेनेचे शहरासाठी इतर उपक्रम
शहर विकासात समावीष्ट करावयाच्या कामांची यादी करण्यात आली आहे. या यादीत शहराचा विकास कसा करता येईल याचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील कामांची यादी पुढीलप्रमाणे – शिवतीर्थ स्मारक येथील पडलेली भिंत बनवणे, सुरक्षा जाळी बसवणे, छत्रपती शिवाजी महाराज यांना रोज अभिषेक व्हावा व सावली मिळावी या दृष्टीकोनातून मेघडंबरी व त्यातूनच ऑटोशॉवर सिस्टीम लावणे .बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई यांचे स्मारक चौकात सुस्थितीत उभारणे व सुशोभीकरण करणे. मुख्य रस्त्यानवरील वीजतारा भूमीगत करून दुभाजकांची उंची वाढवून त्यात नाशिक शहरात लावलेल्या नारळासारखी उंच झाडे लावणे व एलइडी लाईट्स बसवणे. प्रमुख थांब्यावर सार्वजनिक मुत्रालये व शौचालयांची उभारणी.आकाशवाणी चौकात जागा मिळशल्यावर 50 फुट उंचीचा महर्षी वाल्मीकऋषी यांचा पुतळा उभारणे. कालिकामाता मंदिरासमोर 50 फुट उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारणे .हिंदू स्मशानभूमीत मेहरूण, पिंप्राळा, नेरी नाका येथे विद्युत दाहीनी उभारणे. हिंदूच्या मयत मुलांसाठी दफनविधीची जागा निश्चित करून ही दुर्लक्ष केली जाणारी समस्या सोडवणे. मेहरूण तलाव येथे चौपाटीलगत आनंद सागरप्रमाणे परिसर विकस्ति करुन ते पर्यटनस्थळ बनवणे.महानगरपालिकेच्या जुन्या जागा व साने गुरुजी रूग्णालयाच्या जुन्या जागेवर 5 मजली वाहन पार्कीग उभारणे. जिल्हा परिषदेच्या विद्या निकेतन शाळेची रंगरंगोटी करणे. शिवतीर्थ मैदानावर चौफेर जॉगिंंग ट्रेक बनवून फुटपाथ जिम उभारणे. प्राणीसंग्रहालय स्थापित करणे व यासाठी कोल्हे हिल्स परिसरातील वनविभागाची जागा निश्चित करणे.14) शहरात तारांगण, स्पेस सेन्टर व विज्ञान भवन उभारणे, त्यासाठी महात्मा गांधी उद्यान वापरणे. तेथेही तारांगण व विज्ञान भवन उभारणे. खान्देशाचा इतिहास व केळीची ओळख जगाला सांगणार्‍या प्रवेशद्वारांची उभारणी अन्य शहरांकडे जाणार्‍या रस्त्यांवर करणे.

शिवाजी महाराजांमुळे आज देव देव्हार्‍यात
शिववंदनेचे काही नागरीकांना आश्‍चर्य वाटत असतांना संघटनेला बर्‍याच नागरीकांनी प्रश्‍न केला की, शिवाजी महाराज देव नाही, असे असतांना आरती करण्याचे काय कारण आहे. यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने ही आरती लिहीली आहे तो व्यक्त स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, सावरकरांनी काहीतरी शिवाजी महाराजांबद्दल वाचलेले आहे. आपण सावरकरेंपेक्षा तर मोठे नाही. काहीतरी मुद्दा तर असेल की त्यांनी शिवाजी महाराजांची आरती लिहीली. विशेष म्हणजे आपल्या घरात देव्हार्‍यात आजही देवे फक्त शिवाजी महाराज यांच्यामुळे टिकून आहे. म्हणून संघटनेचे सर्व सदस्य त्यांना देव मानतात.
– महेश सपकाळे,  संस्थापक अध्यक्ष

आरतीतला एकेक शब्द छत्रपतींचा इतिहास मांडणारा
शहरात अनेक स्मारके आहेत हे स्मारक फक्त स्मारक न राहता त्याला देवळाचे स्वरूप यावे, स्वच्छता, स्मारक धुणे गरजेचे आहे. नाहीतर काही दिवसांनी गडकिल्ल्यांसारखी त्याची अवस्था होण्याची भिती आहे, फक्त जयंती व पुण्यतिथीच्याच दिवशी त्यांचे स्मरण करून सफाई केली जाते व त्यानंतर मात्र पुर्णपणे दुर्लक्ष होते. त्यामुळे ‘शिववंदना’ आरतीचा उद्देश आहे. आरतीतले प्रत्येक कडवे इतिहास मांडते. यातून महाराज काय होते, याचा बोध होतो. आठवड्यातून किमान एक दिवसतरी हे होणे गरजेचे आहे. येथष एकत्र आलेल्या समुदायाचे प्रबोधश्र केले जाते
– ललित सोनावणे, एक मनसबदार

तरूण-तरूणींचा लक्षणीय सहभाग
‘एकच शब्द, शिवगंध’ या पथकात उच्चशिक्षित तरूण, तरूणी असून काही डॉक्टर, वकील, विद्यार्थी व विद्यार्थीनींचा समावेश आहे. जिल्ह्यात होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवत आहे. त्यातून मिळणार्‍या आर्थिक उपलब्धतेनुसार शिवस्मारकांसाठी हातभार लागत आहे. ढोलपथकात समाविष्ट प्रत्येक सदस्य कोणतेही मानधन घेत नाही. खान्देश मॉल परीसरात रोज किमान 3 तास सराव केला जातो. हा सराव मुख्य कार्यक्रमांच्या महिनाभर आधी सुरू केला जाते. विशेष म्हणजे दर रविवारी पथकात अनेकजण सहभाग नोंदवतात.

-परेश सीनकर, शिवगंध ढोलपथक, व्यवस्थापक

सामाजिक जाण रुंदावली
तीन वर्षापुवी मी स्वराज्य निर्माण सेनेशी जुळलो नसतो तर आज कुठेतरी भटकत राहिलो असतो. स्वराज्य निर्माण सेनेशी जोडल्यानंतर शिवाजी महाराज, संभाजी महाराज कोण होते. त्यांच्या युद्धाची रणनिती कशी होती? या अनेक प्रश्‍नांचा उलगडा झाला. आज प्रत्येकजण शिक्षण घेऊन आपल्यापुरता विचार करत आहे. आजूबाजूला काय सुरू आहे, याचा विचार करत नाही. असेच छत्रपती शिवाजी महाराजांनी केले असते तर ..? त्यांचे वडील कर्नाटकात राजे होते, जिजाऊ पालखीत फिरल्या असत्या, पण त्यांनी असे केले नाही. या संघटनेत आल्यानंतर कुणालाच कटाक्षाने इतरत्र होणार्‍या राजकारणात आम्ही जाऊ देत नाही.

– स्वप्नील शेटे,  एक मनसबदार