निमगावच्या तरुणाची आत्महत्या

यावल : तालुक्यातील निमगाव येथील 22 वर्षीय अविवाहित तरुण योगेश रवींद्र धनगर यांना आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कुटुंबातील एकूलता एक असलेल्या योगेशने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. शेजारच्यांना ही घटना लक्षात येताच त्यांनी यावल पोलिसांना माहिती कळवली. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.अक्षय लाडगे यांनी शवविच्छेदन केले. मयत तरुणाच्या आईचे आधीच निधन झाले आहे. मयताच्या पश्‍चात वडिल व बहिण आहे. याबाबत यावल पोलिसात पोलिस पाटील प्रमोद हरीदास तावडे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे.