निमखेडी शिवारातील बंद घरातून 72 हजारांचा मुद्देमाल लांबवला

जळगाव : निमखेडी शिवारात बंद घर फोडून घरातील सोन्याने दागिणे आणि चांदीच्या वस्तू असा एकुण 72 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
प्रतीक दिलीपकुमार गार्तीया (36, रा.टिळक नगर, निमखेडी शिवार, जळगाव) हे खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान ते घराला कुलूप लावून गावाला गेले होते. अज्ञात चोरट्यांनी जिन्याचा बंद दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिणे आणि चांदीच्या वस्तू असा एकूण 72 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. रविवारी दुपारी 12 वाजता प्रतीक गार्तीय हे घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. प्रतीक गार्तीया यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे.