निजामुद्दीन मर्कझचा प्रमुख मौलाना साद फरार

0

नवी दिल्ली – निजामुद्दीन मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत नियमांचे उल्लंघन करणार्‍या आणि करोनाचा फैलाव करणार्‍या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मौलाना फरार आहे. मौलानाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके उत्तर प्रदेशात पाठवण्यात आली असून मशिद आणि इतर ठिकाणी शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.
एफआयआर दाखल केल्यापासून मोहम्मद सादने आपला मोबाइल बंद ठेवला आहे. त्याची एक ऑडिओ क्लिप नुकतीच समोर आली होती ज्यामध्ये त्याने आपण विलगीकरणात असल्याचा दावा केला होता, क्राइम ब्रांचची टेक्निकल टीम ऑडिओ क्लिपच्या सहाय्याने मोहम्मद सादची माहिती मिळते का यासाठी प्रयत्न करत आहेत.

Copy