दहावीच्या परिक्षेच्या दडपणातून विद्यार्थ्याची आत्महत्या

0

पिंपरी-चिंचवड : दहावीच्या परिक्षेच्या अभ्यासाचे दडपण आल्याने विद्यार्थ्याने राहत्या घरात घेऊन आत्महत्या केली. अथर्व संतोष पाटील वय (वय 16, रा. त्रिवेणीनगर, निगडी. मूळ रा. जळगाव) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचा हा प्रकार शनिवारी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला. काही दिवसांवर दहावीची परीक्षा आहे. या परिक्षेचे त्याच्यावर दडपण होते. शनिवारी त्याच्या खोलीमध्ये तो अभ्यास करत बसला होता. रात्री उशीर झाला तरी त्याने दरवाजा उघडला नव्हता. दरवाजा ठोठवला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडला असता अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दहावीच्या परिक्षेचे दडपण असल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले, असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.